anekant.news@gmail.com

9960806673

एक दिवसीय चर्चासत्र आयोजित : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन इंडिया

या वर्षीच्या अवर्षण परिस्थीत उसाच्या लागणीं कमी झाल्या. त्याचा परिणाम 2024-25 च्या गळीत हंगामावर होणार आहे. या गळीत हंगामात तुटणारा लागणीचा उसाचा खोडवा आणि तुटणारा खोडव्याचां निडवा असे दोन्ही जास्तीत जास्त जोपासले तर कांहीं प्रमाणात उसाचा पुरवठा वाढेल आणि गळीताचे दिवस वाढतील.
खोडवा आणि निडवाचे उत्पादन वाढवण्यसाठी शास्त्रोक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे शास्त्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे ही आवश्यक आहे. याच उद्देशाने DSTAI डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन इंडिया या सुप्रसिद्ध संस्थेने एक दिवसीय चर्चासत्र आयोजित केले आहे.
शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळ 5.00 पर्यंत, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात येथील साखर कारखान्याचे शेती आणि ऊस विकास अधिकारी यांना आमंत्रित केले आहे.
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन इंडिया चे शास्त्रज्ञ अवर्षण स्थितीत खोडवा नोडवा चे शास्त्रोक्त व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांमार्फत शेतकरयांना प्रशिक्षित करता येईल.
तसेच डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन इंडिया चे शास्त्रज्ञही कारखान्याच्या मागणी नुसार शेतकरी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यासाठी कार्यक्षेत्रावर येतील.

डॉ. संजीव माने कृषिरत्न
कनवेनार, DSTAI, पुणे