anekant.news@gmail.com

9960806673

ऊसतोडणी मजुरीत वाढ करा

स्वाभिमानी तोडणी वाहतूक संस्थेतर्फे साखर आयुक्तांना निवेदन

बेळगाव ः स्वाभिमानी ऊसतोडणी व वाहतूक संस्था, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातर्फे साखर आयुक्तांना ऊसतोडणी मजुरीत वाढ करावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, करार 2023-24 ते 2025-26 या 3 वर्षांच्या करारानुसार 3 वर्षांसाठी आहे. आजचा वर्तमान दर कमिशनशिवाय 273.14 आहे. वजावटीत 34 टक्के वाढ आणि खटल्याच्या कमिशनमध्ये एक टक्का वाढ आणि दर केल्यास तो 366 आणि 20 टक्के कमिशन म्हणजे 73.20 एकूण 439.20 असा होतो.

राज्यातील ऊसतोडणी मजुरांच्य दरानुसार राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी हा तोडणी मजुरी दर सर्व संबंधित साखर कारखान्यांना ऊसतोडणी मजुरी अदा करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र कामगार संघटनेने दिलेल्या वाढीव दरानुसार तफावत आढळून आली आहे. कमी वेतनामुुळे हे ऊसतोड कामगार पुढील हंगामात येणार नाहीत, अशी चिन्हे आहेत. त्यानुसार ही वाढ दिल्यास पुढील हंगामासाठी सोयीचे होईल व येथील शेतकर्‍यांच्या ऊसतोडणीसाठी स्वाभिमानी शुगरकेन कटिंग ट्रान्सपोर्ट असोसिएशन कर्नाटक राज्य तसेच विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून विनंती केली आणि आदेश द्यावेत असे सांगितले.

यावेळी स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटना महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य संघटनेचे राज्याध्यक्ष राजगोडा पाटील, महाराष्ट्र राज्याध्यक्ष रावसाहेब अबदान, उपाध्यक्ष तानाजी पाटील, राज्य सचिव प्रविण शेट्टी आदी उपस्थित होते. (सकाळ, 02.04.2024)