anekant.news@gmail.com

9960806673

मळीपासून खत निर्मितीला चालना देण्याच्या हालचाली

दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनमध्ये 28 मे रोजी चर्चासत्र

पुणे ः साखर उद्योगात मुबलक प्रमाणात मळी उपलब्ध होत आहे. मात्र मळीपासून पालाश खताची निर्मितीची क्षमता अद्यापही पूर्ण वापरली गेलेली नाही. त्यामुळे मळीतील पालाश निर्मितीला चालना देेण्यासाठी खत उद्योगाने हालचाली सुरू केल्या आहेत. देशातील नामवंंत खत निर्मिती कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या दि फर्टिलायझर्स असोसिणशन ऑफ इंडियाने मळी आधारित खत निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. येत्या 28 मे रोजी पुण्याच्या दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनमध्ये (डीएसटीए) सकाळी 9 ते 5 या वेळेत होत असलेल्या या चर्चासत्रामध्ये खत उद्योगातील निर्माते, विपणन क्षेत्रातील प्रतिनिधी, आयातदार व निर्यातदार, वितरक, संशोधन, धोरणकर्ते सहभागी होत आहेत.

जमीन सुपीकतेमधील नैसर्गिक पालाशयुक्त खताचे महत्त्व व देशातील पालाशयुक्त सममतोल वापराची स्थिती, पालाशय ुक्त खतांची निर्मिती विपणन यातील संधी व आव्हाने, स्पेन्टवॉशपासून खताची निर्मिती, पालाशयुक्त खते व कृषी विभागाचे नियम, खतांच्या संधोधनाची वाटचाल अशा महत्त्वांच्या मुद्यांवर या चर्चासत्रात मते मांडली जाणार आहेत. (अ‍ॅग्रोवन, 15.05.2024)