anekant.news@gmail.com

9960806673

एस. निजलिंगाप्पा शुगर इन्स्टिट्युट इन्स्टिट्यूटवर एम.पी. पाटील, सत्यजित पाटील

सहकारी कारखाना विभागातील दोन जागा, अमित कोरे यांच्या पुढाकाराने बिनविरोध

चिक्कोडी ः एस. निजलिंगाप्पा शुगर इन्स्टिट्युट संस्थेच्या 2024-2029 या कालावधीसाठी संचालक मंडळासाठी 31 रोजी निवडणूक होणार आहे. बेळगाव विभागातून सहकारी कारखान्यांच्या प्रतिनिधींच्या 2 जागांसाठी मलगोंडा पिरगोंडा तथा एम.पी. पाटील व सत्यजित पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

एस. निजलिंगाप्पा शुगर इन्स्टिट्युट संस्थेसाठी निवडणूक लागली आहे. बेळगाव विभागातून सहकारी कारखान्यांच्या प्रतिनिधीत्वासाठी 2 जागांसाठी ही निवडणूक होणार होेती. त्यासाठी 8 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केली होती. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर महामंडळाचे व चिदानंद बसवप्रभू कोरे कारखान्याचे संचालक अमित कोरे यांनी अर्ज दाखल केलेल्या 8 जणांशी चर्चा करून निवड बिनविरोध करण्याचे यशस्वी प्रयत्न केले.

त्यामध्ये निपाणीच्या हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष एम.पी. पाटील व नंदी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यजित शिवानंद पाटील यांची बिनविरोध निवड निश्‍चित केली. उर्वरित 6 जणांनी अर्ज माघार घेतले. या निवडीची अधिकृत घोषणा नंतर होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी अमित कोरे म्हणाले, एस निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्युट म्हणजे या भागातील सहकारी साखर कारखाने व शेतकरी यांचा कणा आहे. त्यासाठी निवड झालेल्या नवनिर्वाचित संचालकांनी भागातील साखर कारखानदारांच्या व त्यांच्या कणा असलेल्या शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्न करावेत. नूतन संचालकांनी येत्या 5 वर्षात साखर कारखानदार आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न सरकारपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून कारखाना शेतकर्‍यांना लाभ करून द्यावा. (सकाळ, 26.03.2024)