2 कोटी 55 लाख टन उसाचे गाळप
छत्रपती संभाजीनगर ः मराठवाड्यात यंदा ऊस गाळपात सहभाग घेणार्या 61 कारखान्यांपैकी 57 कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे. या सर्व कारखान्यांनी 11 एप्रिलपर्यंत 2 कोटी 55 लाख 32 हजार 993 टन उसाचे गाळप करत 2 कोटी 45 लाख 19 हजार 22 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हे साखर उत्पादन करताना लातूर जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा सर्वात जास्त तर बीड जिल्ह्यातील कारखान्यांनी सर्वात कमी राहिला आहे.
यंदाच्या गाळप हंगामात सहभाग घेणार्या 61 कारखान्यांमध्ये धाराशिवमधील 14, छत्रपती संभाजीनगर व नांदेडमधील प्रत्येकी 6 , हिंगोली व जालन्यातील प्रत्येकी 5, बीड व परभणीतील प्रत्येकी 7, तर लातूरमधील 11 कारखान्यांचा समावेश होता. साखर विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत 57 कारखान्यांनी त्यांचा ऊस गाळप आटोपल्याची माहिती दिली आहे. त्यामध्ये धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड व लातूर या जिल्ह्यातील कारखान्यांचा समावेश आहे. जालन्यातील 3 व हिंगोलीतील 1 कारखान्याचा ऊस गाळपह हंगाम अद्याप सुरू असल्याचे साखर विभागाच्या माहितीवरून पुढे येत आहे.
जिल्हानिहाय ऊस गाळप व बंद कारखाने स्थिती
धाराशिव - जिल्ह्यातील 6 सहकारी व 8 खासगी मिळून 14 कारखान्यांनी ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी 51 लाख 33 हजार 847 टन उसाचे गाळप करत 47 लाख 19 हजार 740 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 9.19 टक्के इतका राहिला हे सर्व कारखाने बंद झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर - जिल्ह्यातील 3 सहकारी व 3 खासगी मिळून 6 कारखान्यांनी ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी 18 लाख 83 हजार 271 टन उसाचे गाळप करत 18 लाख 34 हजार 636 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 9.74 टक्के इतका राहिला. या सर्व कारखान्यांचे गाळप बंद झाले आहेत.
जालना - जिल्ह्यातील 3 सहकारी व 2 खासगी मिळून 5 कारखान्यांनी ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी 27 लाख 89 हजार 159 टन उसाचे गाळप करत 26 लाख 51 हजार 560 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 9.51 टक्के इतका राहिला
बीड - जिल्ह्यातील 5 सहकारी व 2 खासगी मिळून 7 कारखान्यांनी ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी 39 लाख 61 हजार 276 टन उसाचे गाळप करत 32 लाख 55 हजार 379 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 8.22 टक्के इतका राहिला. या सर्व कारखान्यांचा गाळप हंगाम बंद झाले आहेत.
परभणी - जिल्ह्यातील 7 खासगी कारखान्यांनी 33 लाख 35 हजार 545 टन उसाचे गाळप करत 33 लाख 6 हजार 840 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 9.91 टक्के इतका राहिला. या सर्व कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपलाआहे.
हिंगोली - जिल्ह्यातील 3 सहकारी व 2 खासगी मिळून 5 कारखान्यांनी ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी 15 लाख 41 हजार 938 टन उसाचे गाळप करत 15 लाख 36 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 9.96 टक्के इतका राहिला. या कारखान्यांपैकी 4 कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपले आहेत.
नांदेड - जिल्ह्यातील 1 सहकारी व 5 खासगी मिळून 6 कारखान्यांनी ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी 19 लाख 47 हजार 236 टन उसाचे गाळप करत 19 लाख 40 हजार 535 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 9.97 टक्के इतका राहिला. या सर्व कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपले आहे.
लातूर - जिल्ह्यातील 6 सहकारी व 5 खासगी मिळून 11 कारखान्यांनी ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी 49 लाख 40 हजार 721 टन उसाचे गाळप करत 52 लाख 74 हजार 332 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 10.68 टक्के इतका राहिला. या सर्व कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. (अॅग्रोवन, 16.04.2024)