anekant.news@gmail.com

9960806673

साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना सचिव संवर्गात पदोन्नती

पुणे ः राज्याचे साखर आयुक्त आणि सनदी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना शासनाने सचिव संवर्गात पदोन्नती दिली आहे. ते 2008 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. नाशिक महापालिका आयुक्त, रस्ते विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक संचालक म्हणून ते काम बघत होते. समृद्धी महामार्गासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेचे काम त्यांनी पाहिले आहे. तत्पूर्वी त्यांनी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी, पुनर्विकास अधिकारी, मेळघाट येथे उपविभागीय अधिकारी, कृष्णा खोरे प्रकल्पात विशेेष भूसंपादन अधिकारी, नांदेडमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी, परभणीत उपविभागीय अधिकारी, अंधेरीत एमआयडीसीचे उपमहाव्यवस्थापक आदी पदांवर काम केले आहे. 2008 मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे ते खासगी सचिव म्हणून, त्यानंतर तत्कालीन आरोग्यमंत्र्यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. प्रशासनाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. साखर आयुक्त म्हणून ते सध्या कार्यरत असून, मंत्रालयस्तरावर त्यांची पदोन्नतीमुळे नियुक्त होण्याची अपेक्षा आहे. (पुढारी, 03.02.2024)