anekant.news@gmail.com

9960806673

हालसिद्धनाथकडून 3 हजार जमा

निपाणी ः येथील श्री हालद्धिनाथ सहकारी साखर कारखान्याने 1 ते 15 फेब्रुवारी या काळात 57 हजार 26 मे.टन उसाचे गाळप केले आहे. त्यापोटी प्रतिटन 3 हजार प्रमाणे 17 कोटी 10 लाख रूपये ऊस बिलाची रक्कम ऊस पुरवठादार शेतकर्‍यांचा खात्यावर जमा केेली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष एम.पी. पाटील यांनी दिली.

कारखान्याने या हंगामात आतापर्यंत 6 लाख 79 हजार मे.टन उसाचे गाळप करून 6 लाख 85 हजार 810 किंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. 11.30 इतका साखर उतारा आहे. गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून शेतकरी, ऊस उत्पादक ांनी वेळेत कारखान्याला ऊस पुरवठा करून सहकार्य करावे असेही अध्यक्ष पाटील म्हणाले. (सकाळ, 20.02.2024)