anekant.news@gmail.com

9960806673

सिद्धेश्‍वरच्या चेअरमनपदी ज्ञानेश्‍वर मोठे

सिल्लोड ः येथील सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या चेअरमनपदी ज्ञानेश्‍वर मोठे यांची बिनविरोध निवड झाली. चेअरमन व व्हा. चेअमनगपदाच्या निवडीसाठी बुधवार दि. 3 एप्रिल रोजी कारखान्याच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी. काकडे, सुधाकर गायके, व्ही.पी. रोडगे यांच्या उपस्थितीत झाली.

अनेक वर्षांपासून कारखान्याचे चेअरमन सिल्लोड तालुक्यास तर व्हा. चेअरमनपद भोकरदन तालुक्यास दिले जाते. त्यामुळे यावेळी व्हा. चेअरमनपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष होते. परंतु व्हा. चेअरमन पदासाठी उमेदवारी अर्जच दाखल न झाल्याने हेे पद रिक्त राहिले.

* कारखान्यावर विविध बँकांचे कोट्यावधींचे कर्ज आहे. 10 वर्षांपूर्वी भाजपच्या ताब्यात कारखान्याची सत्ता आली. त्यानंतर काही वर्षी कारखाना सुरू राहून बंद पडला. त्यानंतर क्रमाक्रमाने कारखान्यातील निवृत होत गेलेल्या कर्मचार्‍यांची रक्कम देण्यासाठी कारखान्याने तरतूदच न केल्यामुळे कर्मचारी टप्प्याटप्प्याने कामगार न्यायालयात गेल्याने कारखान्याची जमीन जप्‍त करून तिचा लिलाव करित कर्मचार्‍यांची देणी देणे बाकी आहे. कारखान्याची परिस्थिती बघता मागील चेअरमन इद्रिस मुलतानी यांनी कारखाना सुरू करून भाडेतत्त्वावर दिला, तर डिस्टलरीदेखील सुरू करून भाडेतत्त्वावर देण्यात आली. आता पुढील काळात चेअरमन मोठे यांना कारखान्याची आर्थिक मोट बांधून कर्मचार्‍यांची देणी देण्यासह इतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. शिवाय सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या उपदानावर तोडगा काढू. कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. कारखाना आर्थिक अडचणीत असला तरी त्यावर मात करत सभासदांनी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवू. - ज्ञानेश्‍वर मोठे, नवनिर्वाचित चेअरमन, सिद्धेश्‍वर साखर कारखाना (सकाळ, 04.04.2024)