उरूळी कांचन ः यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उरूळी कांचन ऊस उत्पादक गट क्रमांक 1 मध्ये अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सुशांत सुनील देवकर, संतोष आबासाहेब कांचन व सुनील सुभाष कांचन हे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी उरूळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात रविवार दि. 10 मार्च रोजी सकाळपासून सुरू आहे. (पुढारी, 11.03.2024)