anekant.news@gmail.com

9960806673

इथेनॉल नियमावलीचा भंग झाल्यास कारवाई करा

केंद्राचे उत्पादन शुल्क विभागाला आदेश
पुणे ः इथेनॉल निर्मितीच्या अनुषंगाने उसाचा रस व मळीच्या वापराबाबत जारी केलेल्या नव्या नियमावलीचा भंग झाल्यास संबंधित साखर कारखाना किंवा आसवनीच्या विरोधात तत्काळ कारवाई करा, असा आदेश केंद्राने दिला आहे. इथेनॉलनिर्मितीच्या आधीच्या नियमावलीत केंद्राने बदल केले आहेत. केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या साखर व खाद्यतेल संचालनालयाचे साखर संचालक श्री. संगीत यांनी 15 डिसेंबरला राज्यातील साखर कारखान्यांना एक पत्र पाठवले होते. त्यानुसार कोणत्याही साखर कारखान्याने किंवा आसवनीने रेक्टिफाईड स्पिरिट तयार करण्यासाठी न्युट्रल अल्कोहोल तयार करण्यासाठी उसाचा रस किंवा बी हेव्ही मळी वापरता कामा नयेे, असे लेखी आदेश बजावण्यात आलेले आहेत. या पत्रानंतर राज्यातील सर्व प्रकल्पांनी आपापल्या नियोजनात बदल केलेले आहेत.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार साखर व खाद्यतेल संचालनालयाचे अवर सचिव अनिल कुमार स्वारनकर यांनी आता थेट राज्याच्या उत्पादन शुल्क आयुक्ताकडे पत्रव्यवहार केला आहे. केंद्राने यापूर्वीच आरएस व इएनए बाबत आदेश दिलेले आहत. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होईल याासठी दक्षता घ्यावी.मात्र, आदेशाचा भंग झाल्यास राज्य उत्पादन शुल्क विषयक कायद्यानुसार तुम्ही तत्काळ कारवाई करा, असे अवर सचिवांनी गुरूवार दि. 21 डिसेंबर रोजी उत्पादन शुल्क आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
मळीवर आधारित आसवनी प्रकल्पांनी सी हेव्ही मळीपासून इथेनॉल तयार करण्याचा प्रयत्न करावा, असे केंद्राने आधी स्पष्ट केलेेले होते. मात्र, आता उसाचा रस, पाक व बी हेव्ही मळीपासून मर्यादित प्रमाणात इथेनॉल तयार करण्यास केंद्राने मान्यता दिलेली आहे.
केंद्राने 7 डिसेंबरला इथेनॉल निर्मितीच्या नियमावलीत बदल केले होते. त्यानुसार उसाचा रस व बी हेव्ही मळीपासून तयार होणार्‍या इथेनॉलच्य पुरवठा वर्ष 2023-24 मधील स्थितीचा आढावा तेल विपणन कंपन्यांनी घ्यावा. त्यानंतर आधीच्या कोट्याचे फेरवाटप करावे फेरकरारांबाबत केंद्रीय अन्न मंत्रालयाला कळवावे, असे ठरलेले होते. तेल कंपन्यांकडून फेरकरारांबाबत निश्‍चित होईल इतकेच इथेनॉल (उसाचा रस व बी हेव्ही मळीपासून तयार केलेले) संबंधित कारखाने आसवनींनी पुरवावे, असेही निश्‍चित केले गेले आहे. (अ‍ॅग्रोवन, 23.12.2023)