anekant.news@gmail.com

9960806673

राधानगरी केंद्रात ऊस संशोधन

महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून प्रस्तावित ः साडेतीन कोटी खर्च अपेक्षित
राधानगरी ः ऊस संशोधन संस्था कोईमतूरच्या धर्तीवर राधानगरीतील कृषी संशोधन केंद्रात ऊस संकरीकरण संच उभारणी करून ऊस संशोधन बळकटीकरण योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रस्तावित केली आहे. यामुळे आगामी काळात या केंद्रातून अधिकाधिक ऊस संशोधनातून हवामानशी अनुकूल शाश्‍वत उत्पादनक्षम राज्यातील वाणांची निर्मिती होईल. भरीव निधी आणि यंत्रणा उपलब्धतेतून ऊस संशोधनाची व्रूापकता वाढीचे संकेत आहेत.
सध्या पाडेगावांतील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. राधानगरीचे हवामान उसाला फुलोरा येण्यास उपयुक्त असल्याने विद्यापीठाच्या निर्देशानूसार येथील कृषी संशोधनात केंद्रात एक दशकपूतीर्र् ऊस संशोधन सुरू झाले. मात्र, ऊस फुलोरा येण्याचा कालावधी एक ते दीड महिन्याचा, नर व मादी फुलोरा समरूप प्राप्‍त न झाल्याने संकरीकरण मर्यादित केले जाते. अधिकाधिक ऊस संशोधन करण्यासाठी ऊस संकरीकरण संचाच्या उभारणीतून संशोधन बळकटीकरणाचा प्रस्ताव पुढे आला. प्रस्तावानुसार जवळपास साडेतीन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
बळकटीकरण प्रस्ताव उद्दिष्टे
* उसाचे अधिक उत्पन्नक्षम, साखर उतारा अधिक, लवकर पक्व होणार्‍या जैविक घटक प्रतिकार रक्षक वाणांची निर्मिती, मर्यादित काळात अधिकाधिक ऊस संकरीकरण प्रक्रिया करणे, उपलब्ध जनुकांचा त्याच्या वैशिष्ट्यानुसार संकरित करण्यासाठी वापर.
* पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातून अद्याप उसाचे 16 नवीन वाण विकसित केले आहेत. यातील 14 वाणांची निर्मिती कोईंमतूर येथे जाऊन केलेल्या संकरीकरणातून झाली आहे. ऊस संकरीकरण संच उभारणीतून केंद्राच्या बळकटीकरणाची गरज अधोरेखित झाली. राधानगरी कृषी संधोधन केंद्राबरोबरच पाडेगाव केंद्राचाही प्रस्तावात समावेश आहे.
* कोईमतूर धर्तीवर पाडेगाव आणि राधानगरीतील प्रस्तावित ऊस संकरीकरण संच उभारणी करून संशोधन बळकटी करणारे आवश्यक ऊस संकरीकरण केले जाईल. संकरीकरणातून मिळणारे संकर चाचणी प्रयोगात समाविष्ट विशेष गुणधर्माप्रमाणे पुढील उद्दिष्ट पूर्तीसाठी वापरले जाणार आहेत. (अ‍ॅग्रोवन, 17.01.2024)