कारखान्याच्या 21 जागांवर पॅनलच्या उमेदवारांचा विजय
पैठण ः येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत चेअरमन सचिन घायाळ व तुषार शिसोदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकून बाजी मारली आहे. मा. आ. संजय वाघचौरे यांच्या पॅनलच्या सर्व 9 उमेदवारांचा दणदणीत पराभव झाला.
संत एकनाथ कारखान्याच्या 21 संचालक पदासाठी निवडणूक पार पडली. या अगोदर सचिन घायाळ यांच्या शेतकरी विकास पॅनलचेे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 15 संचालक पदासाठी 11 फेअ्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले.सोमवार दि. 12 रोजी संत एकनाथ कार्यालयात मतमोजणी झाली. मतमोजणीत सचिन घायाळ यांच्या शेतकरी पॅनलच्या उमेदवारांनी आ. संजय वाघचौरे यांच्या शेतकरी बचाव पॅनलच्या 9 उमेदवारांचा दणदणीत पराभव केला. (पुण्यनगरी, 13.02.2024)