anekant.news@gmail.com

9960806673

कृष्णा कारखान्याकडून 3100 रूपयांप्रमाणे ऊस बिल शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा

रेठरे बुद्रुक ः येथील य.मो. कृष्णा साखर कारखान्याने सन 2023-24 च्या गळीत हंगामात कृष्णा कारखान्यास आलेल्या सर्व उसाचे प्रतिटन 3100 रूपयांप्रमाणे गाळप हंगाम समाप्‍तीपर्यंतचे एकूण 418 कोटी 70 लाख रूपयांचे ऊसबिल शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे, तसेच तोडणी वाहतूकदारांचे बिलही अदा करण्यात आली आहेत अशी माहिती कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आली.
चेेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची क्षमता वाढून ती प्रतिदिन 12 हजार मे.टन झाली. या गळीत हंगामात कारखान्यात 13 लाख 50 हजार 652 मे.टन उसाचे गाळप करण्यात आले, तसेच 15 लाख 20 हजार क्विंटल साखर पोती उत्पादित करण्यात आली. यंदाच्या गळीत हंगामात कारखान्यास आलेल्या सर्व उसाचे प्रतिटन 3100 रूपयांप्रमाणे गाळप हंगाम समाप्‍तीपर्यंतचे एकूण 418 कोटी 70 लाख रूपयांचे ऊस बिल शेतकर्‍यांच्य बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. (सकाळ, 21.04.2024)