anekant.news@gmail.com

9960806673

संतोष कुंभार यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

कोकरूड / वार्ताहर
डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज शुगर युनिट श्री निनाईदेवी कारखान्याचे युनिट हेड संतोष जयकुमार कुंभार यांनी साखर उद्योगात दिलेल्या विशेष योगदानाबद्दल भारतीय शुगर या राष्ट्रीय साखर उद्योगात काम करणाऱ्या संस्थेकडून बेस्ट इंडस्ट्री एक्सलन्स ऑफ द इयर' हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
संपूर्ण भारतामध्ये सहकारी व खासगी असे सुमारे ५३० साखर कारखाने कार्यरत आहेत. त्या सर्वांमधून संतोष कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. सदरचा पुरस्कार वितरण कार्यक्रम दि. १० फेब्रुवारी रोजी हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे होणार आहे. संतोष कुंभार हे रसायनशास्त्रातील पदवीधर असून त्यांनी या अगोदर कर्मयोगी इंदापूर, रेणुका शुगर, ओलम शुगर, सिद्धेश्वर साखर कारखाना सोलापूर, बारामती अॅग्रो, पिकॅडल्ली शुगर हरियाणा येथे चांगल्या पद्धतीने काम केले आहे. सध्या ते श्री निनाईदेवी करुंगली आरळा येथील - कारखान्याचे युनिट हेड म्हणून काम पाहत आहेत. ऊस उत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम राबवून ते यशस्वी केले आहेत.