anekant.news@gmail.com

9960806673

विठ्ठलराव शिंदे सांगता

टेंभूर्णी ः येथील पिंपळनेर येथील 18 लाख 90 हजार मे.टन गाळप झालेल्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ कारखान्याचेे संस्थापक चेअरमन बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या हंगामामध्ये अत्यंत प्रतिकुल स्थिती होती. ऊस कमी आहे असे वाटत होते. मात्र तरीही लांबलेल्या पाऊसामुळे हंगाम चांगला झाला.

पिंपळनेर व करकंब या दोन्ही युनिटचे मिळून 25 लाख मे.टनाच्या वर गाळप झाले. यामुळे 2-3 वर्षातील गळीताचे रेकॉर्ड मोडले आहे. एकरी 36 टनाचे अवरेज मिळाले आहे. भविष्यात एकरी उत्पादन वाढीसाठी शक्य ते प्रयत्न करणार आहेत. पुढील हंगामासाठी 16 हजार 425 हेक्टर उसाच्या नोंदी आहेत. तर युनिट दोनकडे 4 हजार 95 नोंदी आहेत, असे चेअरमन बबनराव शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की केंद्र शासनाने ज्यूस टू इथेनॉल अचानक बंद केले. यामुळे गळीताचा वेग मंदावला. 3 लाख मे.टन गाळप कमी झाले. कारखान्याने जानेवारी 16 ते 31 मध्ये 50 रूपये, फेब्रुवारीमध्ये 100 रूपये, मार्चमध्ये 150 रूपये जादा पेमेंट दिले आहेे. यासाठी 13 कोटी रूपये जादा द्यावे लागले. तसेच 2700 प्रमाणे दर 10 दिवसाला शेतकर्‍यांना पेमेंट दिले आहे.

कारखान्याने आतापर्यंत उसाचे वाहतूक व तोडणी बिल अदा केले आहे. युनिट नं.-1 चे 677 कोटी तर युनिट नं.-2 चे 154 कोटी पेमेंट जमा केले आहेत. हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखान्याचे सर्व अधिकारी वर्ग, सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी, कामगार, तोडणी मजूर अशा सर्वांची चांगली साथ लाभली आहे. हंगाम यशस्वी पार पडल्याबद्दल कामगारांना एक महिन्याचा पगार बक्षिस म्हणून देणार. पोळा दिवाळीस पुढील हप्‍ता देणार तसेच ज्यांचा ऊस जानेवारी ते मार्च दरम्यान गेला आहे, त्यांना वाढीव रक्कम रोख देण्याएवजी ईफको खते देण्यातयेणार आहेत, असे चेअरमन बबनराव शिंदे म्हणाले.

साखर संघाच्या निर्णयानुसार कारखान्याकडे ऊसतोडणी करणार्‍या बैलगाडी, टॅक्टरगाडी व ट्रक ट्रॅक्टर याना ऊसतोडणी दरात 34 टक्के व कमिशनमध्ये 1 टक्का वाढ देणारा राज्यातील एकमेव साखर कारखाना आहे. - चेअरमन, बबनराव शिंदे (एकमत, 08.04.2024)