anekant.news@gmail.com

9960806673

नासाका जमीन विक्री रद्द करण्यासाठी आंदोलनाचा इशारा

जिल्हा बँकेच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक
नाशिक ः पळसे ग्रामपंचायतीने 1974 मध्ये गावातील गायरान क्षेत्र हे साखर कारखाना उभारणी तसेच शेतकरी व कामगारांच्या हितासाठी दिले होते. याच जमिनीसंदर्भात नाशिक जिल्हा बँकेने नासाकाच्या जमीन विक्रीसाठी काढलेल्या निविदेला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. ही अतिरिक्त जमीन विक्री निविदा रद्द करावी, अन्यथा जिल्हा बॅकेच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा गुरूवार दि. 8 जानेवारी रोजी ग्रामसभेत ग्रामस्थांनी दिली.

नाशिक सहकारी साखर कारखाना जिल्हा बँक खा. हेमंत गोडसे यांच्या कंपनी सोबत भाडेकरार केल्याने चार तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. मात्र सुमारे 140 कोटी रूपयांच्या कर्जवसुलीसाठी जिल्हा बँकेच्या ताब्यातील कारखान्याचे अतिरिक्त क्षेत्र विक्री किंवा भाड्याने देण्याबाबत निविदा काढली आहे. यामुळे पळसे ग्रामस्थांनी शनिवार दि. 8 जानेवारी रोजी सभा घेतली.

शेतकर्‍यांचे हित जोपासण्यासाठी पळसे गावाने साखर कारखाना उभारण्यासाठी गायरानची जागा दिली आहे. त्या जागेवर उभारलेल्या साखर कारखान्याचे कर्ज काढून जिल्हा बँकेने वसुलीसाठी गावाची जागा विक्रीची निविदा काढणे बेकायदा आहे. गायरानची जागा बँकेला विक्री करताच येणार नसून, बँकेची जमीन विक्रीबाबतची भूमिका संशसास्पद असल्याने विक्रीच निविदा रद्द करावी, अन्यथा त्याविरोधात संपूर्ण गाव आंदोलनात उतरेल असा इशारा देण्यात आला.

जिल्हा बंँकेने कारखाना अवसायनात काढून भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला आहे. तर जमीन विक्रीचे कारणच काय? जिल्हा बँकेच्या हेतू बद्दल शंका असून जमीन विक्री होऊ देणार नाही. - प्रिया दिलीप गायधनी, सरपंच, पळसे ग्रामपालिका 2002 च्या कायद्यानुसार जागा विक्री करता येत नाी. जागा विक्री करता येणार असा ग्रामपंचायत ठराव करण्यात आला आहे. त्यास पंचक्रोशीतून विरोध आहे. उर्वरित क्षेत्र ग्रामपंचायतीला परत देण्यात यावा अशी मागणी आहे. - विलास गायधनी, नासाका संघर्ष समिती (सकाळ, 09.02.2024)