anekant.news@gmail.com

9960806673

22 लाख टन साखरेचा कोटा खुला

पुणे ः केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यासाठी 22 लाख टन साखरेचा कोटा खुला केला आहे. मागणीच्या तुलनेत मुबलक कोटा जाहीर झाल्याने साखरेचे दर स्थिरावण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतू वर्तविण्यात आला. जानेवारी महिन्यासाठी 23 लाख टन कोटा खुला करण्यात आला होता.
फेब्रुवारी महिन्यात असलेल्या कमी दिवसांमुळे त्यामध्ये कपात करून 22 लाख टनांचा कोटा खुला करण्यात आलेला आहे. बाजारात साखरेला मागणी चांगली असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. सध्या घाऊक बाजारात एस 30 ग्रेड साखरेचा क्विंटलचा भाव 3775 ते 3800 रूपये आहे. तर साखरेच्या निविदा क्विंटलला 3450 ते 3500 रूपये या दराने जात आहेत. मात्र मुबलक साखर कोट्यामुळे दर स्थिरावण्याचा अंदाज आहे. (पुढारी, 30.01.2024)