राशिवडे ः भोगावती साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील 1 ते 15 डिसेंबरअखेर उसाचे बिल प्रतिटन 3200 रूपयांप्रमाणे 21 कोटी 77 लाख रूपये बिल ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील-देवाळेकर व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली.
कारखान्याने 36 दिवसात 1 लाख 62 हजार 290 टन गाळप करून 1 लाख 81 हजार 640 साखर पोती उत्पादित केली. सरासरी साखर उतारा 11.27 टक्के आहे. 6 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, ऊस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष कवडे यांनी केले. (सकाळ, 02.01.2024)