anekant.news@gmail.com

9960806673

ऊसतोडणी दरात 34, तर कमिशनमध्ये 1 टक्क ा वाढ

सहाव्या बैठकीत निघाला 3 हंगामांसाठी तोडगा ः आंदोलन मागे
पुणे ः राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर ऊसतोडणी मजुरांना ऊसतोडणीच्या मजुरीत 34 टक्के वाढ आणि मुकादमाच्या दलालीत (कमिशन) 1 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ऊसतोड कामगारांची मजुरी प्रतिटन 274 रूपयांवरून 367 रूपयांवर जाणार आहे. तर मुकादमांना 1 टक्का वाढीव कमिशन मिळणार आहे.
साखर आयुक्तालयात झालेल्या बैठकीत हा ऊसतोडणी मजूर आणि कारखानदारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्या लवादाने पुढील 3 वर्षांसाठी हा निर्णय घेतला. बैठकीला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, सुरेश धस आदी उपस्थित होते.
याबाबत दांडेगावकर म्हणाले, कामगारांनी ऊसतोडणीच्या दरात 40 टक्के वाढीची मागणी केली होती. तर कारखानदार 21 टक्के दरवाढीवर आडून बसले होते. त्यात समन्वय साधून 34 टक्के दरवाढ देण्यात आली. ऊसतोड कामगारांची मजुरी प्रतिटन 274 रूपयांवरून 36 रूपयांवर जाणार आहे. तर मुकादमांना 1 टक्का वाढीव कमिशन मिळणार आहे, मुकादमांना या पूर्वी 19 टक्के कमिशन होते ते आता 20 टक्के होणार आहे. ही दरवाढ या हंगामापासून 3 वर्षांसाठी असणार आहे.
दरम्यान, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे काम अपेक्षित गतीने पुढे जात नाहीत. त्याबद्दल मी असमाधानी असल्याचे पंकजा मुंंडे म्हणाल्या. त्या विषयी आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कामगारांना समाधानकारक वाढ झाली आहे. आंदोलन मागे घेण्यात आले असून उर्वरित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा करत राहू. - प्रा. डॉ. सुभाष जाधव, सरचिटणीस, महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना (लोकमत, 05.01.2024)