पशुपालकांना चिंता ः उसाचे वाढे नष्ट होण्याच्या मार्गावर
बोरगाव काळे ः साखर कारखाने सुरू झाले की, उसाची तोडणी करण्यासाठी शेत शिवारात ऊसतोड मजुरांची लगबग असायची. मा आता दरवर्षी ऊसतोड मजुरांची संख्या घटत असल्याने ऊसतोडणीला पर्याय म्हणून हार्वेस्टर यंत्र आले आहे. त्याद्वारे उसाची तोडणी होत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत जनावरांना मिळणारा हिरवा चारा अर्थात उसाचे वाढे मिळत नसल्याचे चित्र आहे.
मांजरा पट्टा भागात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. येथील शेतकर्यांचे ऊस हेच प्रमुख पीक असल्याने येथील शेतकरी जोडधंदा म्हणून दूध उतपादनाचा व्यवसाय करतात. गळीत हंगामात येथील पशुपालक दुभत्या जनावरांसाठी उसाच्या वाढ्याच्या हिरवा चारा म्हणून वार करतात. पूवीपासून ऊसतोड मजुरांमार्फत उसाची तोड होत असल्याने चार पाच महिने उसचे वाढे सहज उपलब्ध व्हायचे. त्यामुळे जनावरांना हिरव्या चार्याची कमतरत जाणवत नव्हती.
आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्याने ऊसतोडणीसाठी हार्वेस्टर यंत्र आले आहे. यंत्राद्वारे कमी वेळेत ऊसतोड होऊ लागल्याने कारखाल्याला आवश्यक ऊस पुरवठा होत आहे. दरवर्षी ऊसतोड मजुरांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे उसाची तोडणी करण्यासाठी यंत्राचा पर्याय सर्वच कारखाने अवलंबित आहेत. यंत्राद्वारे उसासोबत वाढ्याचेही तुकडे होत असल्यान उसाचे वाढे दुर्मिळ होताना दिसून येत आहे. आता येथून पुढे पावसाळा सुरू झाल्यावरच हिरवा चारा उपलब्ध होईपर्यंत पशुपालकांंना दुभत्या जनावरांच्या चार्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
ऐन उन्हाळ्यात हिरवा चारा मिळत नसल्याने सरकी पेंड, हरभर्याचे गुळी, ज्वारीचा कडबा आदींवरच जनावरांची गुजराण करावी लागणार आहे. हिरवा चार्याअभावी दूध उत्पादनात घट येण्याची चिन्हे आहेत. पुढील काळात पूर्ण क्षमतेने उसाची तोडणी हार्वेस्टर यंत्राद्वारे होणार असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांना चारा म्हणून मिळणारे उसाचे वाढे मिळत नसल्याचे चित्र आहे.
* पूर्वी ऊसतोड मजूर उसाची तोड करायचे. त्यामुळे शेतकर्याजवळ विक्रीसाठी वाढे असायचे. आता यंत्राद्वारे ऊसतोड होत असल्याने उसासोबत वाढ्याचाही चुराडा होत आहे. त्यामुळे जनावरांना उसाचे वाढे आता मिळेनासे झाले आहे अशा परिस्थितीत जनावरांना चारा आणायचा कोठून, असा प्रश्न येथील पशुपालकांना पडला असल्याचे दिसून येते.
* आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्याने ऊसतोडणीसाठी हार्वेस्टर यंत्र आले आहे. यंत्राद्वारे कमी वेळे ऊसतोड होऊ लागल्याने कारखान्याला आवश्यक ऊस पुरवठा होत आहे. दरवर्षी ऊसतोड मजुरांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे उसाची तोडणी करण्यासाठी यंत्राचा पर्याय सर्वच काराने अवलंबित आहेत. लातूर तालुक्यातील विविध भागात सध्या यंत्राद्वारे उसाची तोडणी करण्यात येत आहे. (लोकमत, 29.02.2024)