anekant.news@gmail.com

9960806673

नॅचरल उद्योग विषमुक्त अन्न संकल्पना राबविण्यात यशस्वी

डॉ. पुलकुंडवार ः रसायनमुक्त चार लाख साखर पोत्यांचे पूजन
शिरढोण ः विषमुक्त अन्न ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्यात नॅचरल उद्योग समूहाने 100 टक्के यश मिळविले आहे, असे मत साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केली. नॅचरल शुगरच्या चालू गळीत हंगामातील रसायनमुक्त गंधक विरहित 4 लाख 1 साखर पोत्याचे पूजन डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, पर्यावरण असंतुलनाबरोबरच विषारी रसायनमुक्त अन्नधान्यामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. पर्यावरण संतुलित विकास व विषमुक्त अन्न हे ध्येय उराशी बाळगून नॅचरल शुगरने पर्यावरण संतुलित विकास साधला. तसेच रसायनमुक्त साखर, इथेनॉल या प्रमुख उत्पादनांसह वीजनिर्मिती, शुगर रिफायनरी, बायो सीएनजी (सीबीजी), पोटॅश, सल्फर, लिक्विड फर्टिलायझर्स, लिक्विफाईड सीओटू, डेअरी व उपपदार्थ आदी उपक्रम राबवून विविध पदार्थ व उपपदार्थ निर्माण करण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे.
नॅचरल शुगरच्या प्रकल्पांसाठी लागणारे पाणी उसातूनच मिळविले जाते. अधिकचे पाणी बागेसाठी वापरले जाते. प्रत्यक्ष चिमणीतून निघणारा धूरही ड्रायर प्रकल्पासाठी उष्णतेचा सोर्स म्हणून वापरून येथे 20 टक्के पोटॅश तयार केला जातो. (अ‍ॅग्रोवन, 29.12.2023)