anekant.news@gmail.com

9960806673

॥ ऊगवत्या दिनकरा ॥

पहाटेला उषःकाली
पुर्व दिशा उजळून
दिसले सूर्यनारायण
ओवाळू आरती तुज
ऊगवत्या दिनकरा ॥१॥
ऊठिले सकळजन
करा सडासमांर्जन
काढा रांगोळी स्वागता
ओवाळू आरती तुज
ऊगवत्या दिनकरा ॥२॥
आईच्या हाकेने हळू
जागे होती ताईभाऊ
अंगणात तुझे गान
ओवाळू आरती तुज
ऊगवत्या दिनकरा ॥३॥
वेदशास्त्र पुराणेही
तुझाच गाती महिमा
पुजती दिशा दिक्पाल
ओवाळू आरती तुज
ऊगवत्या दिनकरा ॥४॥
सर्व ॠतु दास तुझे
हे जीवनदात्या सर्व
तुझे गाती गुणगान
ओवाळू आरती तुज
ऊगवत्या दिनकरा ॥५॥
चार भुजा सात अश्व
कोटीच्या कोटी किरणे
जगाला देती आधार
ओवाळू आरती तुज
ऊगवत्या दिनकरा ॥६ ॥
मावळतीला अर्ध्य देता
सांजेला गौ घरा येता
करिती संध्या स्तवन
ओवाळू आरती तुज
ऊगवत्या दिनकरा ॥७॥
देव दानव नारी नर
भूचर जलचर खेचर
करिती तुमचे गान
ओवाळू आरती तुज
ऊगवत्या दिनकरा ॥८ ॥

रचनाकार:आहेर वा.र.नासिक
बी.ई.एमआयई.बीओई
९९५८७८२९८२