जुन्नर ः ऊस उत्पादक शेतकर्यांनी पूर्व हंगामी व सुरू उसाची लागवड करून, तुटणार्या उसाचा खोडवा ठेवण्यास प्राधान्य द्यावे, श्री विघ्नहर साखर कारखाना चांगला बाजारभाव देण्यास कमी पडणार नाही, अशी ग्वाही अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी ऊस विकास परिसंवाद दिली.
ते म्हणाले की, आपल्या कार्यक्षेत्रातील एकरी 100 टनापेक्षा जास्तीत जास्त ऊस उत्पादक घेणार्या शेतकर्यांचे सर्वांनी मार्गदर्शन घेतले पाहिजे. कमी क्षेत्रात अधिकाधिक ऊस घेतले पाहिजे. अन्य पिकांना हमीभाव नसल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने शाश्वत हमीभाव असलेल्या ऊस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करून त्याची नोंद करावी व ऊस गाळपास द्यावा.
उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकी विभागामार्फत ऊस विकास योजना राबविल्या जातात व शेतकर्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जाते. पठार भागासाठी कमी पाण्यासाठी व पाण्याचा ताण सहन करणार्या ऊस वाणाची माहिती घेत आहे. - सत्यशिल शेरकर, अध्यक्ष, विघ्नहर साखर कारखाना (सकाळ, 18.02.2024)