anekant.news@gmail.com

9960806673

क्रांती तर्फे तोेडणी वाहतूक करारास प्रारंभ

कुंडल ः येथील क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2024-25 च्या तोडणी वाहतूक करारांचा प्रारंभ कारखान्याचे मार्गदर्शक व अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते पार पडला. लाड म्हणाले, पुढील हंगामाचे14 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तरी सर्व वाहतूक कंत्राटदारांनी करार लवकरात लवकर पूर्ण करून चांगल्या प्रतिचा ऊस गाळपास आणावा.

अध्यक्ष लाड म्हणाले, महाराष्ट्रात प्रथम क्रांती कारखान्याने तोडणी वाहतूक दर 15 टक्क्यांनी वाढ दिली. त्याच बरोबर शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 34 टक्के मधील फरक ही तोडणी वाहतुकदारांना दिली आहे. कारखान्याने यंदा 10 लाख 92 हजार टन ऊस गाळप करून क्रांती कारखाना आघाडीवर राहिला आहे. येणार्‍या हंगामात 14 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. याकरिता प्रतिदिन गाळप क्षमता 7500 वरून 10 हजार करण्याकरिता लागणार्‍या मशिनरी बसवण्याचे काम सुरू केले आहे. (पुढारी, 16.04.2024)