anekant.news@gmail.com

9960806673

वारणा कारखान्याच्या 30 टन साखरेचे चोरी


ट्रक मालकास अटक ः 23 टन साखर जप्‍त
कोडोली ः ट्रान्सपोट कंपनीचा विश्‍वास संपादन करून येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विक्रीसाठी पाठवलेली 30 टन साखर चोरल्याप्रकरणी ट्रक मालक सोहेल दस्तगीर पटेल यास कोडोली पोलिसांनी अटक केली आहे. चोरीतील 23 टन 850 किलो साखरेसह ट्रक पोलिसांनी जप्‍त केला आहे.
दिग्विजय बाळासो मल्लाडे यांनी 8 मार्चला साखर चोरी प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीनुसार ट्रक मालक सोहेल दस्तगीर पटेल यास अटक करण्यात आली असून ट्रक चालक सिद्धांत गवंड, मनोहर केदारे हे अद्याप फरारी आहेत. वारणा कारखान्यात 4 मार्च रोजी 30 टन साखर ट्रकमध्ये भरून ती ब्रिटानिया इंडस्ट्रिज कंपनीस न उतरता फसवणूक करून अपहार केला होता. (लोकमत, 12.03.2024)