anekant.news@gmail.com

9960806673

ऑर्मस्ट्राँग कारखाना 51 कोटींची थकबाकी भरणार

नाशिक ः दाभाडी येथील आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा.लि. या कंपनीने कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी जिल्हा बँकेला एक रकमी सेटलमेंटचा प्रस्ताव दिला आहे. कारखान्याकडील 51 कोटी 66 लाख रूपयांची थकबाकी आहे. ती भरण्याची तयारी कारखान्याने ठेवली आहे तसे पत्र कारखान्याने दिले आहे. मार्च एंड जवळ येताच जिल्हा बँक प्रशासनाने थकीत कर्जदारांवर कारवाईचा बडगा उगारला असून, मागील 15 दिवसांत तब्बल 10 कोटींची वसुली झाली आहे. दाभाडी येथील कारखान्याने देखील थकबाकी भरण्याची तयारी दर्शविल्याने बँकेला दिलासा मिळाला आहे.

दाभाडी येथील आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्‍चर विरोधात बँकेने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. बँकेने वर्तमानपत्रात यापूर्वीच सहकार अधिनियमान्वये नोटीस प्रकाशित केली आहे. येथे 31 मार्च 2024 पर्यंत संबंधित संस्थेच्या कर्जाची परतफेड न केल्यास कारखान्यास दाभाडी येथील सर्वे क्रमांक 159 या 33.49 एकर जमिनीचा लिलाव करून संबंधित कर्जाची वसुली करण्यात येणार आहे. त्यामुळे बँकेला मोेठी वसुली मिळणार आहे. (लोकमत, 21.02.2024)