anekant.news@gmail.com

9960806673

जिल्ह्यात गळीत हंगाम अंतिम टप्प्यात

गाळपात कृष्णेची, उतार्‍यात राजारामबापूची आघाडी

इस्लामपूर ः सांगली जिल्ह्यात ऊसतोडीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्या साडेतीन महिन्यात जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या 14 साखर कारखान्यांनी 82 लाख 40 हजार 812 मे.टन उसाचे गाळप केले आहे. तर 89 लाख 42 हजार 700 क्विंटल साखरेचे उतपादन झाले आहे. या हंगामात गाळपात कृष्णा तर उतार्‍यात राजारामबापू साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे.

यावर्षी ऊस दराचे आंदोलन, अवकाळी पाऊस यामुळे साखर कारखान्याचा गळीत हंगामात अडथळे येत गेले. नोव्हेंबर महिन्यात बहुतांश कारखान्यांच गळीत हंगाम सुरू झाले. ऊस दरावर तोडगा निघत नव्हता. त्यामुळे सुरूवातीच्या काळात तोडी संथ गतीने सुरू होत्या. यावर्षी कार्यक्षेत्रात हार्वेस्टरची संख्या जास्त असल्याने उसाचे क्षेत्रही झपाट्याने कमी होवू लागले आहे. तरीही मार्च अखेरपर्यंत हंगाम चालण्याची शक्यता आहे. राजारामबापू कारखान्याच्या जत युनिटचे गाळप बंद करण्यात आले आहे. (पुढारी, 22.02.2024)