वडूज ः ऊस म्हटलं, की अधिक खर्चिक पीक, त्यासाठी मुबलक पाणी, मोठे भांडवल लागते असा सूर शेतकर्यांमध्ये कायम असतो. मात्र, ज्या त्या भागातील हवामान, पाणी, जमीन, अन्नद्रव्ये, खतांची मात्रा यांची योग्य पद्धतीने सांगड घालून उसाची लागवड व जोपासना केल्यास उसाचे एकरी 100 टन उत्पादन निश्चित मिळू शकते, असा विश्वास पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. धर्मेंद्र फाळके यांनी व्यक्त केला. दैनिक अॅग्रोवन, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक व खटाव माण तालुका अॅग्रो प्रोसेसिंग यांच्या वतीने ऊस उत्पादन वाढ व खोडवा व्यवस्थापन या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
फाळके म्हणाले, या भागात कालव्याचे पाणी आल्याने ऊस लागवडीकडे शेतकर्यांचा कल वाढला असला तर ऊस शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. उसाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने लागवड, जोपासना करणे आवश्यक आहे. श्री घार्गे म्हणाले, कमी पाण्यात अधिक उत्पादन कसे घेता येईल, यासाठी शेतकर्यांमध्ये जागरूकता केली जात आहे. (सकाळ, 29.01.2024)