anekant.news@gmail.com

9960806673

मुक्तेश्‍वर सांगता

शेंदूरवाडा ः गंगापूर तालुक्यातील मुक्तेश्‍वर शुगर मिल्सचा 14 व्या गाळप हंगामाची सांगता शनिवार दि. 6 एप्रिल रोजी करण्यात आली. कारखान्याने 3,50,115 मे.टन उसाचे गाळप करून साखरेचे 3,59,700 पोते उत्पादन केले असून साखर उतारा 10.27 मिळाला. शेतकरी, ऊसतोडणी वाहतूक कामगार, अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत करून गाळप उद्दिष्ट पूर्ण केले, असे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मणराव गाडे यांनी यावेळी सांगितले. (सकाळ, 09.04.2024)