बांबवडे ः अथणी शुगर्स कारखान्याने 85 दिवसांत 3 लाख 35 हजार 455 मे.टन गाळप पूर्ण केले. सरासरी साखर उतारा 11.55 टक्केने 3 लाख 63 हजार 890 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. 15 जानेवारीपर्यंत गाळपासाठी आलेल्या सर्व ऊस बिलाची रक्कम एफआरपीपेक्षा जास्त दर देऊन 15 दिवसांत देणची परंपरा ठेवली आहे. प्रतिटन 3200 रूपयेप्रमाणे ऊस पुरवठादार शेतकर्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. शिवाय तोडणी वाहतुकीची बिलेसुद्धा देण्यात आली आहेत, अशी माहिती योगेश पाटील यांनी दिली. (पुढारी, 07.02.2024)