आजरा ः आजरा तालुका शेेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी वसंतराव धुरे यांची तर उपाध्यक्षपदी एम.के. देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीनंतर पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर पहिलीच संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळी पार पडली.
निवडीपूर्वी सर्व उमेदवारांच्या मुलाखतीनंतर निश्चित करण्यात आलेल्या व पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि प्रमुखांनी दिलेला बंद लखोटा खोलण्यात आला. यावेळी नेते मंडळींनी सुरूवातील अध्यक्ष म्हणून वसंतराव धुरे व उपाध्यक्ष म्हणून एम.के. देसाई यांची निवड करण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. या सूचनेनुसार धुरे व देसाई यांची निवड करण्यात आली. (प्रेसनोट, 28.12.2023)