anekant.news@gmail.com

9960806673

राज्यात अद्यापही दीड हजार कोटींची एफआरपी थकीत

94 कारखान्यांनी दिली 100 टक्के एफआरपी
पुणे ः राज्यातील साखर कारखान्यांची उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची ऊसतोडणी वाहतूक खर्चासह देय रक्कम 17 हजार 633 कोटी रूपये आहे. त्यापैकी 31 जानेवारीअखेर कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 16 हजार 126 कोटी रूपये (91.45 टक्के) जमा केलेेले, तर 1507 कोटी रूपयांची एफआरपी रक्कम अद्यापही थकीत असल् याचे जानेवारीअखेरच्या अहवालातून स्पष्ट होते.
राज्यात 31 जानेवारीअखेर 206 साखर कारखान्यांनी 570 लाख टन उसाचे गाळप पूर्ण केलेले आहे. त्यापोटी ऊसतोडणी वाहतूक खर्चासह देय एफआरपीची 100 टक्के रक्कम 94 साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना दिलेली, तर 80 ते 99 टक्के रक्कम 49 कारखाने, 60 ते 79 टक्के रक्कम 33 आणि शून्य ते 59 रक्कम 30 कारखान्यांनी दिलेली आहे. एफआरपीची संपूर्ण रक्कम 112 साखर कारखान्यांनी दिलेली नसल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे.
दरम्यान, थकीत एफआरपीप्रश्‍नी संबंधित साखर कारखान्यांच्या सुनावण्या लवकरच घेण्यात येतील. प्राधान्याने ज्या साखर कारखान्यांनी 60 टक्क्यांच्या आत शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम दिली, अशा 30 साखर कारखान्यांच्या सुनावण्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याद्वारे कारखान्यांच म्हणणे ऐकून पुढील कारवाई साखर आयुक्तांच्या मान्यतेने करण्यात येईल, असे साखर आयुक्तलयातील साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी सांगितले. (पुढारी, 07.02.2024)