anekant.news@gmail.com

9960806673

संतनाथ कारखान्याच्या भंगाराला आग

वैराग ः श्री संतनाथ सहकारी साखर कारखान्यातील आवारातील भंगाराला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वितहानी झाली आहे. वेळेवर अग्निशमन दल दाखल झाल्यामुळे पुढील धोका टळला. शनिवार दि. 30 डिसेंबर रोजी देपारी कारखान्यात ही आग लागल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली.
आठ तालुके आणि दोन जिल्हे कार्यक्षेत्राची अस्मिता असलेला पूर्वाश्रमीचा भोगावती साखर कारखाना नामांतरण करून संतनाथ साखर कारखाना झाला. तरी त्याच्या मागचे भोग काही संपले नाहीत. आधी कारखाना बंद पडला. त्यानंतर जमिन विक्रीस जाऊ लागल्यानंतर कारखान्यातील भंगार चोरीस जाऊ लागले. आता तर कारखान्यात आगच लागली. कारखाना बंद पडल्यानंतर कारखाना आवारात लोखंडी बैलगाड्या ठेवण्यात आल्या होत्या. यातील बैलगाड्यांची टायर्स आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. (लोकमत, 31.12.2023)