anekant.news@gmail.com

9960806673

ब्राझीलने 400 लाख टन साखर उत्पादनाचा टप्पा ओलांडला

गेल्याा वर्षीच्या तुलनेत 35 टक्के वाढ, हंगाम अद्याप सुरूच
कोल्हापूर ः ब्राझीलने यंदाच्या हंगामात साखर उत्पादनाचा 400 लाख टनांचा टप्पा ओलांडला आहे. या देशाच्याा साखर उत्पादनात हंगामाच्या शेवटीही वाढ कायम आहे. यंदा उत्पादनात 35 टक्के वाढ झाली. गेल्या पाच वर्षात ब्राझीलमध्ये यंदा सर्वाधिक साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.
ब्राझीलच्या एकूण साखर उत्पादनात दक्षिण मध्य भागाचा मोठा वाटा आहे. यंदा या भागात नोव्हेंबरअखेर हंगाम सुरू राहिला. सध्या ऊस उत्पादक भागात असणारे कोरडे हवामान ऊस उत्पादक भागात असणारे कोरडे हवामान ऊस तोडीसाठी पूरक ठरले. जागतिक पातळीवर साखरेला चांगले दर मिळत असल्याने अनेक कारखान्यांनी उसाची जास्तीत जास्त तोेड करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे उत्पादनातही चांगलीच वाढ झाली. यंदा 410 लाख टन साखर तयार होण्याची शक्यता आहे. यंदा निर्यात 320 लाख टन होईल, असा अंदाज आहे.
नोव्हेंबरअखेर ब्राझीलने 275 लाख टन साखर निर्यात केली आहे. यंदा साखर उत्पादन वाढल्याने ब्राझीलच्या मुख्य बंदरांना वाहतुकीच्या अडचणी येत आहेत. जहाजांच्या संख्येमुळे इतर शेतीमालाच्या तुलनेत साखरेसाठी जहाजे मिळवणे निर्यातदारांना अडचणीचे ठरत आहे. यामुळे बहुतांश साखर ब्राझीलमधील बंदरावर अनेक दिवस पडून राहत आहे.
यंदा अन्य देशात साखरेला चांगली मागणी आहे. मात्र, प्रत्यक्षात साखरेचा वेळेत पुरवठा करण्यासाठी निर्यातदारांना कसरत करावी लागत आहे. ब्राझीलचा हंगाम एप्रिलला सुरू झाला. गेल्या 5 वर्षात यंदा ब्राझीलचे हवामान चांगले आहे. तोडणीमध्येही जादा पावसाचा अडथळा न झाल्याने कारखाने अजूनही सुरू आहेत. साधारणतः नोव्हेंबरमध्ये हंगाम संपतो. यंदा डिसेंबरमध्येही कारखाने सुरू होते. डिसेंबरमध्ये कारखान्यांनी 2 लाख 36 हजार टन साखर उत्पादन केले. पाच वर्षाम डिसेंबरमध्ये एवढ्या उत्पादनाची ही पहिलीच वेळ असल्याचे युनिका संस्थेने म्हटले आहे.
बाजारपेठेवर वर्चस्व - जागतिक बाजारपेठेवर यंदा ब्राझीलनेच वर्चस्व राहणार हे स्पष्ट आहे. भारतासह अन्य साखर उत्पादक देश नैसर्गिक परिस्थितीअभावी यंदा पिछाडीवर पडत आहेत. याउलट यंदा ब्राझीलमध्ये ऊस उत्पादन वाढण्यासाठी चांगले हवामान सातत्याने असल्याने साखरेच्या उत्पादनात वाढ झाली आहे. (अ‍ॅग्रोवन, 13.01.2024)