anekant.news@gmail.com

9960806673

॥ दुष्काळ निवारण ॥

पावसाने दडी मारली।
नदी नाले धरणे आटली ॥
शेतकऱ्यांची पिकं करपती ।
मजूरांचे लोंढे काम मागती॥
प्यायच्या पाण्याचा तुटवडा झाला ।
म्हणती दुष्काळ आला आला ॥
ढोल बडवा डांगोरा पिटवा ।
पाणीटंचाईचे प्रस्ताव पाठवा॥
टंचाई निवारणाच्या बैठका घ्या ।
आली संधी फायदा घ्या ॥
मंजूर करा टॅकंर गळके।
पाणीवाटपाला वापरा बोळके ॥
सुरू करा रोजगार हमी।
त्यात आर्धे आम्ही आर्धे तुम्ही ॥
फुटातली मापं लिहा मिटराची ।
फिर्यादी द्या विहीर चोरीची ॥
धरणात पाणी आडवा पैसे जिरवा ।
सुकडी वाटपात करा डावा उजवा ॥
लाभार्थी शोषा जनावरांच्या छावण्यात ।
जीआर सुप्रमा काढा येत्या पावसाळ्यात॥
घरी बसून दौ-यांचे बिले काढा ।
राजाला म्हणू नका नागडा॥
सोंगा ढोंगाचा बाजार इथला ।
रस्सा भुरकती कढईतला॥
तेव्हा पाणी पोहचे रातोरात ।
अशी होई दुष्काळावर मात ॥
रचनाकार:आहेर वा.र.नासिक
बी.ई.एमआयई.बीओई
९९५८७८२९८२