नवी दिल्ली ः पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यास सुरूवात केल्याने 2022-23 या आर्थिक वर्षात 24 हजार 300 कोटी रूपयांच्या परकी चलनाची बचत झाली असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील इंधन वितरण कंपन्यांनी 2022-23 या वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केल्याने 509 कोटी लिटर पेट्रोलची बचत झाली. इथेनॉलचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने शेतकर्यांनाही 19 हजार 300 कोटी रूपये देता आले. याशिवाय, पेट्रोलचा वापर कमी झाल्याने 108 लाख टन इतक्या प्रमाणात कार्बन उत्सर्जनही कमी झाले. त्यामुळे इथेनॉल वापरामुळे सर्वांनाच मोठा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. (सकाळ, 04.01.2024)