anekant.news@gmail.com

9960806673

सारथी (ड्रायव्हर)

आम्ही सारथी,ड्रायव्हर,वैमानिक
गाडीवान,टांगेवाला,चालक
नावाडी,शोफर,अग्निरथवाहक
नावे अनेक पण आम्ही सगळेच एक॥१॥
चक्रधारी घनश्यामआमचे पालक
द्वापारीचा श्रीकृष्णही होता चालक
त्रेतायुगात श्रीरामाचे सारथी होते सुमंत
आम्हीही कलियुगात भेदतोआसमंत ॥२॥
ट्रक चालक संगे बि-हाड घेऊन फिरती
ऊनवारा पावसात माल पोहोचवती
पोटासाठी रातोरात गावोगाव भटकंती
एसटीचालकाला मुक्कामावरच शांती ॥३॥
महिनाभर बायका पोरं सोडून घरी
आम्ही भटकतो वणवण दारोदारी
आम्हाला नाही विमा फंड आजारीरजा
जर घरी राह्यला तर खाडा हीचसजा॥४॥
नवनव्या गाड्या गॅसवर वीजेवर
सोलर सीएनजी एलपीजीवर
मालक असतो कायम तुपाशी
आम्ही मात्र असतो ऊपाशी ॥५॥
रचनाकार:आहेर वा.र.नासिक
बी.ई.एमआयई.बीओई
9958782982