anekant.news@gmail.com

9960806673

अनेकांत प्रकाशनची वार्षिक सभा संपन्न


साखर उद्योगाप्रमाणेच आता सिमेंट उद्योगाची माहिती पोहोचविण्यासाठी नवीन वेबसाईटचे अनावरण

जयसिंगपूर ः
शुक्रवार दि. 22.03.2024 रोजी अनेकांत प्रकाशनची 25 वी वार्षिक सभा हॉटेल अम्बेसिडर जैनापूर, जि. कोल्हापूर येथे पार पडली. सभेत मा. श्री. अर्जुन नरदे यांनी सर्वांना मार्गदर्शनपर भाषण केले. तसेच संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री. अमित राशिनकर व श्री. रशिद शेख यांनी देखील विविध विषयांवर चर्चासत्र घडवून साखर उद्योग व्यवसायात येणार्‍या अडचणी आणि त्याच्यावरील उपायावर मार्गदर्शन केले.

आय.टी. प्रमुख अभिनंदन नांद्रेकर तसेच श्री.प्रणव माळी यांनी सिमेंट इंडिया या नव्या वेबसाईटचे अनावरण मा. अर्जुन नरदे व अनेकांतच्या सर्व स्टाफच्या उपस्थितीत पार पडले. श्री. अभिनंदन यांनी वेबसाईट विषयी सर्वांना सखोल मार्गदर्शन केले. अनेकांत प्रकाशनतर्फे दरवर्षी प्रकाशित होणार्‍या शुगर इंडिया, साखर डायरी सोबत आता डिस्टलरीचीही माहिती देणारी डायरी प्रकाशित करण्याची संकल्पना मा. व्यवस्थापक अमित राशिनकर यांनी मांडली.

सभेतील महत्त्वाचे मुद्दे :
सिमेंट उद्योगावरील वेबसाईटचे अनावरण
स्वतंत्र डिस्टलरीसाठी डायरी प्रकाशित करण्याचा निर्णय
2023-24 च्या आर्थिक अहवालाचे वाचन तसेच 2024 च्या आर्थिक घडामोडीचा अंदाज