anekant.news@gmail.com

9960806673

एफआरपीचे 846 कोटी थकित

114 कारखान्यांकडून येणे बाकी, 92 कारखान्यांकडून पूर्ण रक्कम जमा

कोल्हापूर ः यंदाचा हंगाम संपत आला तरी अद्यापही 114 साखर कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्कम ऊस उत्पादकांना दिलेली नाही. फेब्रुवारीअखेर 207 पैकी 92 कारखान्यांनी एफआरपी उत्पादकांच्या खात्यावर जमा केबली आहे. अजूनही 846 कोटी रूपये कारखान्यांकडे थकीत आहेत.

राज्यात 80 ते 99 टक्के एफआरपी 64 कारखान्यांनी, 60 ते 79 टक्के एफआरपी 31,तर 59 टक्क्यांपर्यंत एफआरपी 19 साखर कारखान्यांनी दिली आहे. फेब्रुवारी अखेरीच्या आकडेवारीनुसार 824 लाख टन उसाचे गाळप झाले. तोडणी वाहतूक खर्च वगळता एफआरपी 19 हजार 169कोटी रूपये इतकी झाली आहे. यापैकी 18हजार 323 रूपये ऊस उत्पादकांना देण्यात आले.

हंगाम अंतिम टप्प्यात येत असला तरी अजूनही कारखान्यांकडून गतीने बिले जमा होत नसल्याचे चित्र आहे. सध्या कारखाने हळूहळू बंद होत आहेत. 15 एप्रिलपर्यंत बहुतांश कारखाने बंद होतील, अशी शक्यता आहे. अंतिम टप्प्यात कारखान्यांना उसाचे गाळप करणे कठीण होत आहे. राज्य बँकेने उचलीचा दर कमी केल्याने कारखान्यांना गेल्या महिन्यापासून 100 रूपये कमी मिळत आहे. यातच साखरेला अजूनही समाधानकारक दर नाही. तसेच उन्हाळ्याच्या पाश्‍वभूमीवर अजूनही साखरेला म्हणावी तशी मागणी येत नसल्याने कारखाने अद्यापही साखर विक्रीसाठी धडपडत आहेत, असे कारखाना सूत्रांनी सांगितले. (अ‍ॅग्रोवन, 24.03.2024)