anekant.news@gmail.com

9960806673

माळेगाव कारखान्याची पहिली उचल 3 हजार

शिवनगर ः माळेगाव साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात तुटून येत असलेल्या उसाला पहिली उचल 3 हजार रूपये देण्याचे निश्‍चित केले आहे. शनिवार दि. 23 डिसेंबर रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याचे अध्यक्ष अ‍ॅड. केशवराव जगताप यांनी सांगितले. कारखान्याने एकूण 50 दिवसात 4 लाख 27 हजार 511 मे.टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा 9.87 टक्के उतार्‍याने 4 लाख 19 हजार 800 साखर पोत्यांची निर्मिती केली आहे. एकूण 3 कोटी 24 लाख 43 हजार 300 वीज युनिटची निर्मिती करून यामधील 1 कोटी 88 लाख 2 हजार 560 वीज युनिटची विक्री केल्याची माहिती कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली. (पुढारी, 24.12.2023)