anekant.news@gmail.com

9960806673

कारखान्यांनी सीबीजी, यांत्रिक ऊसतोडणीकडे वळावे

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा सल्ल्ला, व्हीएसआयकडून ऊस क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव
पुणे ः राज्यातील ऊसतोडणी व वाहतुकीत मजूर उपलब्धतेच्या अडचणी आहेत. त्यामुळे आता पारंपारिक ऊस लागवड पद्धतीत बदल करीत यांत्रिकीकरणाकडे वळावे. साखर कारखान्यांनीही यांत्रिक ऊसतोड वाढवावी तसेच आर्थिक स्थिरतेसाठी सीबीजी प्रकल्प उभारावे, असा मोलाचा सल्ला व्हीएसआयचे अध्यक्ष व माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची दि. 11 जानेवारी रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पुण्याच्या मांजरी बुद्रूक येथील मुख्यालयाच्या शिवारात झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
श्री. पवार म्हणाले, इथेनॉलकडे साखर कारखाने वळाले आहेत, मात्र आर्थिकदृष्ट्या व्यवहार्यता हवी असल्यास सीबीजी प्रकल्पाची उभारणी करावी लागेल. शेतकर्‍यांना ऊस उत्पादन वाढवायाचे असल्यास शुद्ध बेणे वापरावे लागेल. त्यासाठी 150 एकरांवर व्हीएसआयचा बेणे उत्पादन कार्यक्रम राबविला जातो. याशिवाय आता मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठी जालना जिल्ह्यात 126 एकरांवर, तर विदभार्र्तील शेतकर्‍यांसाठी नागपूर भागात 135 एकरांवर व्हीएसआयचे काम चालेल. त्याद्वारे संशोधन, ऊस बेणे कार्यक्रम व इतर कृषी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. (अ‍ॅग्रोवन, 12.01.2024)