anekant.news@gmail.com

9960806673

राजगड बंद असला तरी कामगारांचे प्रश्‍न सोडविणार

संचालक मंडळ-कामगार संघटनेत बैठक

नसरापूर ः भोर येथे राजगड कामगार युनियनने उपोषणाचा इशारा दिल्यानंतर सोमवार दि. 19 फेब्रुवारी रोजी राजगड कारखानास्थळावर राजगड कामगार युनियल व संचालक मंडळ यांच्यामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी संचालक मंडळ आणि कामगार युनियल यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये राजगड सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2023-24 बंद ठेवला तरी कामगारांचे प्रश्‍न मार्गी लावणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी सांगितले.

राजगड कारखान्यात झालेल्या चर्चेच्या वेळी गळीत हंगाम 202-24 सुरू करण्याकरिता संचालक मंडळ यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती कामगार युनियनला माहिती देण्यात आली असून त्यात प्रामुख्याने गळीत हंगाम सुरू करण्याकरिता संचालक मंडळाने कारखाना मशिनरीची दुरूस्ती व देखभाल पूर्ण केलेली आहे.

काही अंशी ऊसतोडणी वाहतूक यंत्रणा यांना अ‍ॅडव्हान्स देण्यात आला. काह यंत्रणा हंगाम सुरू झाल्यावर भरण्याबाबत व्यवस्था केली होती. परंतु काही ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा अ‍ॅडव्हान्स घेऊनही न आल्याने व बाहेरची जादाची ऊसतोडणी वाहतूक यंत्रणा न मिळाल्याने गळीत हंगाम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ग्रॅच्युईटी व प्रॉव्हिडंड फंडाबाबत धोरणात्मक निर्णय
* राज्य शासनाने थकहमीचे कर्ज न मिळाल्याने वेळेत ऊसतोडणी वाहतूक यंत्रणा भरता आली नाही व वित्तीय संस्थांनी कर्ज देण्यास पाठ फिरविल्यामुळे कारखाना गळीत हंगाम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चर्चेच्यावेळी कामगारांना सांगितले.
* दरम्यान, राजगड कारखान्याच्या कर्मचार्‍यांना तत्काळ एक पगार देण्याची चर्चा करण्यात आली. परतु कर्मचारी युनियनचे अध्यक्ष राजेशिर्के यांनी कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांचा पाढा संचालक मंडळापुढे मांडत कर्मचार्‍यांचा पगार, प्रॉव्हिडंड फंड, ग्रॅच्युईटी व इतर विषयांवर चर्चा व्हावी, असे सुचविले.
* त्यावेळी संचालक मंडळाने कर्मचार्‍यांच्या देय रककमेबाबत लवकरात लवकर मार्ग काढणार असल्याबाबत संचालक मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
* त्याचबरोबर कर्मचार्‍यांची ग्रॅच्युईटी व प्रॉव्हिडंड फंडाबाबत लवकरच तांत्रिक बाबींचा अभ्यास करून धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे संचालक मंडळ यांनी सांगितले.
* सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे झालेल्या अडचणींवर उभयतांनी वेळोवेळी चर्चा करून मार्ग काढण्याचे संचालक मंडळ व राजगड कामगार यांच्यामध्ये ठरविण्यात आले आहे. (लोकमत, 21.02.2024)