anekant.news@gmail.com

9960806673

मराठवाडा, खानदेशात 68 लाख 45 हजार टन उसाचे गाळप

छत्रपती संभाजीनगर ः येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय अंतर्गत येणार्‍या मराठवाडा व खानदेशातील 5 जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यांनी दि. 6 जानेवारीपर्यंत 68 लाख 45 हजार 331 टन उसाचे गाळप करून 57 लाख 22 हजार 492 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
आजवरच्या ऊस गाळपात सहभाग घेणार्‍या कारखान्यांमध्ये 13 सहकारी तर 9 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. 13 सहकारी साखर कारखान्यांनी 31 लाख 84 हजार 749 टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी 7.86 टक्के साखर उतार्‍याने 25 लाख 1 हजार 712 क्‍चिंटल साखरेचे उत्पादन केले. दुसरीकडे 9 खासगी साखर कारखान्यांनी 36 लाख 60 हजार 582 टन उसाचे गाळप करताना सरासरी 8.8 टक्के साखर उतार्‍याने 32 लाख 20 हजार 780 क्विंटल साखरचे उतपादन केले. तसेच एकूण कारखान्यापैकी जळगाव जिल्ह्यातील एका खासगी कारखान्याच्या गाळप हंगाम थांबला असल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आला.
जिल्हा निहाय ऊस गाळप व साखर उत्पादन
* नंदुरबार जिल्हा ः जिल्ह्यातील 1 सहकारी व 1 खासगी मिळून 2 कारखान्यांनी 7 लाख 90 हजार 794 टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी 8.38 टक्के साखर उतार्‍याने 6 लाख 62 हजार 918 क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
* जळगाव जिल्हा ः जिल्ह्यातील 1 सहकारी व 1 खासगी कारखान्याने गाळप हंगामात सहभाग घेतला. या दोन्ही कारखान्यांनी 1 लाख 84 हजार टन उसाचे गाळप करत सरासरी 8.85 टक्के साखर उतार्‍याने 1 लाख 63 हजार 6 क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
* छत्रपती संभाजीनगर जिल्हा ः जिल्ह्यातील 3 सहकारी व 3 खासगी मिळून 6 कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. या कारखान्यांनी 13 लाख 35 हजार 780 टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी 9.27 टक्के साखर उतार्‍याने 12 लाख 37 हजार 705 क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
* जालना जिल्हा ः जिल्ह्यातील 3 सहकारी व 2 खासगी मिळून 5 कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. या कारखान्यांनी 17 लाख 24 हजार 538 टन उसाचे गाळप केले. या गाळपातून 8.92 टक्के साखर उतार्‍याच्या सरासरीने 15 लाख 38 हजार 895 क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
* बीड जिल्हा ः जिल्ह्यातील एकूण 5 सहकारी व 2 खासगी मिळून 7 कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी 28 लाख 10 हजार 99 टन उसाचे गाळप करताना सरासरी 7.54 टक्के साखर उतार्‍याने 21 लाख 19 हजार 968 क्विंटल साखरेेचे उत्पादन केले. (अ‍ॅग्रोवन, 09.02.2024)