anekant.news@gmail.com

9960806673

उसाच्या नव्या लागवडीत 65 टक्क्यांची घट

साखर उद्योग ः सोलापूर जिल्ह्यात 7 हजार कोटी रूपयांच्या उलाढाल
सोलापूर ः यावर्षी पावसाने मारलेली दडी, रिकामे होत असलेले उजनी धरण, येत्या जूनमध्ये पाऊस वेळेवर हजेरी लावेल की नाही? याची नसलेली शाश्‍वती यामुळे जिल्ह्यातील साखर उद्योगाने धास्ती घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 35 टक्केच उसाची नव्याने लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 65 टक्क्यांनी घट नव्या लागवडीत झाली आहे. नवीन लागवड घटल्याने साखर उद्योगाचा हंगामही फारसा दिलासादायक नसण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्याचा आर्थिक कणा म्हणून सारि उद्योगाकडे पाहिजे जाते. देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. जिल्ह्यातील जवळपास 40 साखर कारखाने गळीत हंगाम घेतात. जिल्ह्यातील 7 हजार कोटी रूपयांची उलाढाल या उद्योगातून होत असल्याने या उद्योगावक्ष जिल्ह्याचे मुख्य अर्थकारण अवलंबून आहे. उसाअभावी आगामी हंगामात कारखाने बंद राहिल्यास त्याचा मोठा फटका ऊसतोडणी मजूर व कारखान्यात काम करणार्‍या कामगारांना बसण्याची शक्यता आहे.
यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी नवीन ऊस लागवडीचे प्रमाण जवळपास 70 टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे पुढच्या हंगामात शेतामध्ये ऊस नसल्याने मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. पुढच्या वर्षी उसाची पीक नसल्याने शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. यावर्षी उजनी धरण 60 टक्क्यांच्या आसपास भरले होते. उजनीतील उपलब्ध पाणी पाहता शेतीसाठी पाणी मिळणे अवघड झाले आहे. पाणी नियोजनाचाही फटका ऊस उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. - गणपत मोरे, ऊस उत्पादक शेतकरी
सध्या नव्याने होत असलेली उसाची लागवड ही भीमा, सीना नदीाच्या काठावर होत आहे. कालव्याला पाणी सोडल्यामुळे खोडवा ऊस शिल्लक राहील. एप्रिल ते जून हे 3 महिने ऊस उत्पादकांसाठी अत्यंत जिकरीचे असणार आहेत. जूनमध्ये पावसाने वेळेवर हजेरी लावली तर जिल्ह्याचे साधारणतः 20 टक्क्यांपर्यंत ऊस क्षेत्र कमी होईल असा अंदाज आहे. यावर्षीही पाऊस उशिरा आला तर अधिक नुकसान होण्याचा धोका आहे. - सचिन जाधव, एम.डी. जकराया शुगर
आकडे बोलतात
* गाळप घेणारे कारखाने - 40
* साखर उद्योगाची अंदाजे उलाढाल - 6 हजार 400 कोटी रूपये
* साखर उद्योगावर अवलंबून असलेेले ऊसतोड मजूर - 2 लाख
* साखर कारखान्यावर अवलंबून असलेले कामगार - 40 हजार
* साखर उद्योगाशी निगडीत शेतकरी साधारणतः - दीड लाख (सकाळ, 01.01.2024)