anekant.news@gmail.com

9960806673

॥आपुला भारत देश महान ॥

इथे वाहति गंगायमुना सिंधु कावेरी।
तापी नर्मदा कृष्णा गोदावरी ॥
हा नंगा हा धवलगिरी।
हा अरवली हा सह्यगिरी ॥१॥
गारो खासी हा निलगिरी।
हिंदुकुश काराकोरम असे उत्तरी ॥
आयोध्या काशी मथुरा कांची पुरी।
अवंति उज्जैन या वसति सप्तपुरी॥२॥
नवी क्षेत्रे इथे वसति चांदीपुर ।
कल्पाकम पोखरण तारापुर ॥
इथे नाग त्रिशूल चांद्रयान ।
ब्राम्होस पिनाक मंगळयान॥३॥
इथेच अहिल्या सीता तारामती।
चावला फोगाट सुधा मूर्ती ॥
इथलेच व्यास कणाद रामानुजम।
साराभाई काकोडकर कलाम॥४॥
बासमती हळदीचे पेटेंट जहाले ।
त्यासाठी माशेलकर लढले ॥
शास्त्रींची मुर्ति होती लहान ।
परि किर्ती त्यांची महान ॥५॥
संविधान ही आपली शान।
आपुले राष्ट्रगीत जनगणमन
आपण ठेवू या तयाचा मान
आपुला भारत देश महान ॥६॥

रचनाकार:आहेर वा.र.नासिक
बी.ई.एमआयई.बीओई
9958782982