anekant.news@gmail.com

9960806673

केंद्राने इथेनॉलच्या धोरणामध्ये सातत्य राखले पाहिजे ः पवार

नारायणगाव ः केंद्र सरकारने इथेनॉलच्या धोरणामध्ये सातत्य राखले पाहिजे, त्यातील फेरबदलामुळे शेतकरी अडचणीत येतात. ब्राझीलमध्ये गरजेनुसार उसापासून साखर किंवा इथेनॉलची निर्मिती केली जाते. विमानाचे इंधनसुद्धा उसापासून बनविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. या बाबींचा केंद्र सरकारने विचार करणे गरजेचे आहे. केंद्राने निर्यात धोरणात बदल करण्याची गरज असून, याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली असल्याचे ज्येष्ठ नेते, माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.
श्री विघ्नहर साखर कारखान्याच्या आसवनी व इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते. विघ्नहर कारखान्याने साखरेबरोबरच वीजनिर्मिती व इथेनॉल प्रकल्पाची उभारणी केली होती. सध्या इथेनॉल प्रकल्पासाठी असलेल्या केंद्र शासनाच्या धोरणाच्या अनुषंगाने इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण केले आहे. त्यामधुन मिळणार्‍या उत्पन्नाचा फायदा ऊस उत्पादक शेतकर्‍यांना निश्‍चितपणे होणार आहे, असेही पवार यांनी सांगितले. (पुढारी, 14.01.2024)