चपळगाव ः मागील वर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. भूजलपातळी कमी होत चालल्याने मार्चपर्यंत उसाचे संगोपन करण्यात अडचणी येत आहेत. लागवडीचा खर्च वाढणार आहे. उत्पादनात घट होणार आहे. अशा कठिण परिस्थितीत शेतकर्यांना दिलासा मिळावा, यासाठी जयहिंद शुगरकडून 16 फे ब्रुवारीपासून येणार्या उसाला प्रतिटन 3 हजार रूपये दर देणार असल्याचे पेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी सांगितले.
माने देशमुख म्हणाले, की यापूर्वी हंगामाच्या सुरूवातीला जाहीर केल्याप्रमाणे 15 फेब्रुवारीपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकर्यांना 2700 रूपयांचा दर देण्यात येणार आहे. 16 फेब्रुवारीनंतर ऊस पुरवठा करणार्या शेतकर्यांच्या खात्यावर 2700 प्रमाणे रक्कम जमा होईल. उर्वरित रकमेपैकी अनुक्रमे 300 व 400 रूपयांचा टप्पा आगामी दसरा, दिवाळीच्या सणासाठी जमा करण्यात येणार असल्याचे प्रेसिडंट माने देशमुख यांनी सांगितले. (लोकमत, 19.02.2024)