anekant.news@gmail.com

9960806673

कादवाचा पहिला इथेनॉल टँकर वितरित


केंद्र शासनाच्या धोरणानुसार 3 लाख 64 हजार लिटरवर निर्मिती

नाशिक ः दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याचे इथेनॉल निर्मितीचे स्वप्न साकार होत आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार कादवाने 3 लाख 64 हजार 387 लिटर इथेनॉल निर्मिती केली आहे. कादवाचे इथेनॉल पेट्रालियम कंपनीकडे वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिला इथेनॉल टँकर हिंदुस्तान पेेट्रोलियमला वितरित झाला असून त्याचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेेटे यांच्या हस्ते झाले.

शेटे यांनी सांगितले की, केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालणे शक्य नसल्याने उपपदार्थ निर्मिती अत्यावश्यक आहे. कादवाने भविष्याचा वेध घेत इथेनॉल प्रकल्प हाती घेत सर्वांच्या सहकार्याने प्रकल्प कार्यान्वित झाला. या प्रकल्पामुळे कारखान्याचा फायदा होत स्थैर्य लाभणार आहे. बायोगॅस प्रकल्प सुरू झाला असून त्यामुळे बगॅस बचत होणार आहे.

कंपोस्ट खत निर्मिती झाली असून त्याचे वितरण सुरू असून सभासदांना उधारीत खत वाटप केले जात आहे. ऊस नोंद व तोडणीचे योग्य नियोजन करण्यासाठी गावनिहाय ऊस उत्पादक यांची समिती स्थापन करून ऊसतोडणीचे नियोजन करण्यात येईल. तसेच जास्त ऊस लागवड करण्याचे आवाहन केले.

कादवा कार्यक्षेत्रात एकाच वेळी ऊस लागवड होत असल्याने ऊसतोडीचे नियोजन विस्कळीत होत असून त्यासाठी गाळप क्षमता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. कादवाला 3500 गाळप क्षमतेचा परवाना मिळालेला असून कमी दिवसात जास्त गाळप करणे गरजेचे असल्याने गाळप क्षमता वाढवण्याचा विचार करावाच लागेल, असे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले. (अ‍ॅग्रोवन, 20.02.2024)