काल रातीला सपान पडलं
सपनात मी ऊस लावला
दुबार नांगर वखर हाकून
ताग धेंचाच बेवड करून ॥१॥
शेणखत पसरून सरी पाडली
86032 ची पाच फुट लागण केली
औषधे खुप स्वस्तात मिळाली
ड्रीप पसरून अझो रायझो दिले ॥२॥
जीवामृत अन ऊस संजीवनी दिले
खते वेळेवर स्वस्त मिळाली
खते दिली कटभरणी वेळेवर केली
आंतर मशागत पण केली ॥३॥
चंद्रवाढतो कलेकलेने ऊस वाढे किलोकिलोने
बारा महिन्याने ऊसतोड आली
कारखान्यावर शेतकीला चकरा नाही
मुकादम ड्रायव्हरने पैसे मागितले नाही॥४॥
एकरी एकशेवीस टन ऊस गेला
भाव टनाला चारहजार रूपये मिळाला
पैसे मोजता मोजता डुलकी संपली
सपानं पाह्यची माझी खोड मोडली ॥५॥
खताचे भाव वाढल्याची बातमी वाचली
मुकादमाची पाच हजाराची चिठ्ठीआली
वीजबिल आले पाणीपट्टी आली
आतामात्र सपनातून पुर्ण जाग आली ॥६॥
रचनाकार:आहेर वा.र.नासिक बी.ई.एमआयई.बीओई
९९५८७८२९८२