anekant.news@gmail.com

9960806673

चार लाख मे.टन गाळप करून आवताडे शुगरची सांगता

कामगारांना १५ दिवसाचा पगार बक्षीस : -चेअरमन संजय आवताडे

मंगळवेढा : तालुक्यातील नंदुर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या आवताडे शुगर्स अँड डीस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याची १ नोव्हेंबरला व्दितीय गळीत हंगामाचा शुभारंभ केला होता तेव्हापासून आज मंगळवार ५ मार्च रोजी ४ लाख ४ हजार ४४४ मेट्रिक टन उसाचे गाळप व ३ लाख 78 हजार 100 साखर पोत्याचे उत्पादन करून कमी कालावधीत जास्त गाळप करत काल ५ मार्च रोजी हंगामाची सांगता करत असल्याचे कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी बोलताना सांगितले, द्वितीय गळीत हंगाम सांगता समारंभ कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक शाम पवार, कार्यकारी संचालक मोहन पिसे, मा मिस्टर संचालक भारत निकम, सरव्यवस्थापक (टेक्नी) सुहास शिनगारे, प्रशांत जगताप आदि प्रमुख मन्यावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे म्हणाले की, कारखानातील सर्व कमर्चारी अहोरात्र झटून कमी कालावधीत हा उचांक गाठू शकलो या काळामध्ये ऊस पुरवठादार, ट्रॅक्टर-बैलगाडी मालक, चालक संघटना ऊस उत्पादक शेतकरी या सर्वांचे सहकार्य लाभल्यामुळे कमी कालावधीत चांगले गाळप झाले असून शेतकऱ्यांना खासगी कारखानदारीत सर्वाधिक पहिला हप्ता २७११ रु दर देऊन हा कारखाना शेतकऱ्यांचा असल्याचे दाखवून दिले आहे व शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. ऊस वाहतूकीमध्ये प्रथम, व्दुतिय व तृतीय क्रमांक काढले असून वाहतूक ठेकेदारांना बक्षिस देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच ज्या कामगार वर्गाच्या कार्यकुशल कामगिरी मुळे कारखाना व्दितीय गळीत हंगाम यशस्वीरीत्या पार पाडू शकले त्या कामगारांना पंधरा दिवसांचा बक्षिस पगार देऊन त्या कामगारांचा सन्मान ठेवण्याचे काम आवताडे शुगर ने केले आहे.

(साप्ताहिक रणयुग टाईम्स, 05.03.2024)